प्रहार जनशक्ती पक्षाच्या मोफत नेत्ररोग तपासणी व आरोग्य तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद..
5८ रुग्णांवर गुरुवारी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार
परभणी – प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने व लायन्स नेत्र रुग्णालय नांदेड आणि पांडुरंग सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.
राजरत्न नगर पिंगळी रोड खानापूर फाटा येथे झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून परभणी शहर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री जयंत सोनवणे, शासकीय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, पांडुरंग मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. व्यंकटेश डुबेवार व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, रविकुमार नरवाडे, मुकुंद खडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर पुरी यांनी केले तर आभार प्रदर्शन अंकुश गिरी यांनी मानले.
शिबिरात २९५ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली यात 5८ रुग्णांना मोतीबिंदू आढळून आला. या 5८ मोतीबिंदूंच्या रुग्णांवर गुरुवार दि. १२ जुलै २०२३ रोजी नांदेड येथील लायन्स नेत्र रुग्णालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याशिवाय मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ३६१ रुग्णांनी विविध आजारांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस मिडिया वैभव संघई, मीडिया प्रभारी नकुल होगे, शहर चिटणीस ॲड. सुवर्णाताई देशमुख, उपशहर प्रमुख सुषमाताई देशपांडे, रामेश्वर पुरी, बालाजी मगर, मुंजा शिंदे, निलेश शेळके, कैलाश जाधव, शेख बशीर, वैभव पवार, बालाजी नरवाडे, सुनील रीक्षे, अमर राऊत, अनिल जाधव, दीपक भूस इत्यादी उपस्थित होते.