आमच्या परळीत प्राजक्ता ताई येतात…आ.सुरेश धस यांचा खळबळजनक हल्लाबोल
अभिनेत्री प्राजक्ता माळी या आमच्याकडे येतात. प्राजक्ता ताईंचा अतिश्य जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न आहे, असे वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केले. बीड जिल्ह्यात ‘आकां’ची 100 ते 150 एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनीत 30 ते 40 कोटी रुपयांचे बंधारे बांधून घेतले आहेत. ‘आकां’कडे पाच वर्षात एवढा पैसा आला कुठून? आम्ही परळीत बघत असतो, रश्मिका मंधाना, सपना चौधरी येत असतात. ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचं शिक्षण घ्यायचं असेल त्यांनी परळीत यावे. प्राजक्ता माळीही (Prajakta Mali) आमच्याकडे येत असतात. त्यांचा अतिश्य जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न बघितला पाहिजे, असे सुरेश धस यांनी म्हटले. सुरेश धस यांनी शुक्रवारी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी खळबळजनक आरोपांची राळ उडवून दिली.
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून संपूर्ण महाराष्ट्रात रोष निर्माण झाला आहे. विशेषत: बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अजूनही देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या जात नाहीयेत याच पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
आका कुठे लपून बसलाय, ते पोलीस अधीक्षकांना सांगितले
सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेले ‘आका’ कुठे फिरत आहे, याची माहिती पोलिसांना दिली. आकांचा सहभाग ३०२ च्या गुन्ह्यात आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर पावले उचलून ‘आका’ला गजाआड करावे, अशी मागणी केल्याचे धस यांनी सांगितले. आका लवकरच पोलिसांच्या हाताला लागतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. बीडमधील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेविरोधात सर्वपक्षीयांच्या ‘मूक मोर्चा’विषयी विचारले असता, सर्व जाती धर्माचे नागरिक मोर्चात सहभागी होतील, आम्हीही सहभागी होऊ. जर आम्ही विरोधी भूमिका घेतली तर लोक चपलेने मारतील, असे धस म्हणाले.