महात्मा बसवेश्वर जयंती निमीत्त उत्सव समितीची पूर्वतयारी बैठक संपन्न

0 49

 

परभणी,दि 21 ः परभणी शहरात क्रांतीसुर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 891 व्या जयंती निमित्त भव्य मिरवणुक व विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्याचे पुर्वतयारीसाठी वसमत रोड परिसरात ताडेश्वर हिरो शोरूम समोर जयंती उत्सव समिती कार्यालय सुरू करण्यात आले आणि तिथे पुर्वतयारी बैठक शनिवार दि. 21 मे रोजी संपन्न झाली. पुर्वतयारी बैठकीमध्ये विविध समित्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अशोकरावजी सावरगावकर साहेब, स्वागताध्यक्ष अरूण पेडगावकर, कार्याध्यक्ष संदीप लकडे उपस्थित होते.

यावेळी शिवा अखिल भारतीय युवक संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर यांनी भव्य मिरवणुकी संबंधी माहिती सांगितली की, परभणी शहरातील शनिवार बाजार येथुन गांधी पार्क मार्ग सोमवार दि. 23 मे रोजी दुपारी ठिक 4.00 वाजता निघणार आहे. त्यात सुंदर देखावे, घोडे, भजनी मंडळे, ढोलताशा पथके असतील. मिरवणुकीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे होणार आहे. तिथेच शिवा अखिल भारतीय युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे आणि प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन, तसेच विविध विरशैव लिंगायत गुरुवर्य शिवाचार्य यांचे गुरू उपदेश होणार आहे. या प्रसंगी परभणी जिल्ह्यातील खासदार, आमदार यांना निमंत्रीत करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी जयंती समितीचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्या तर्फे परभणी शहर परिसरातील समाज बांधवांना भव्य मिरवणुक सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!