प्राचार्य डॉ. बबन पवार शिक्षण क्षेत्राविषयी तळमळ असणारं व्यक्तिमत्व : माजी आमदार डॉ.संतोष टारफे

0 108

परभणी – येथील शारदा महाविद्यालयात कळमनुरीचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शारदा महाविद्यायाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी प्राचार्य डॉ. बबन पवार यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत. बबन पवार हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून शैक्षणीक क्षेत्राविषयी तळमळ असणार व्यक्तिमत्व असल्याचं मत व्यक्त केलं.

 

यावेळी डॉ. सतिश पाचपुते, डॉ . विशाल बोथिकर, बबन डुकरे, सुखदेव कोकाटे यांच्यासह उपप्राचार्य डॉ.शामसुंदर वाघमारे व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. बबन पवार यांनी आमदार डॉ. संतोष टारफे हे गोरगरिबांचे आमदार होते. त्यांनी विधिमंडळात गरीबाचे प्रश्न अत्यंत तळमळीने मांडून सोडवून घेतले. आजही गरिबांचे काम करताना तीच तळमळ असून सध्याच्या काळात असे नेतृत्व दुर्मीळ आहेत असे मत प्रतिपादन केले. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शाम पाठक यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. नवनाथ सिंगापूरे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!