छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पृथ्वीराज धर्मे यांची शाळेस 100 पुस्तकांची भेट…..
पाथरी (प्रतिनिधी):–दिनांक 19
आज शिवजयंती चे औचित्य साधून बोरगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक पृथ्वीराज धर्मे सरांनी विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जाणीव आणि वाचनसंस्कृती वाढावी या उद्देशाने शिवाजी महाराजांवरील शंभर पुस्तकांचा संच शाळेस भेट दिला.
ही पुस्तकांची भेट शाळेसाठी अत्यंत मोलाची ठरणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, राज्यकारभार, युद्धनीती, प्रशासन आणि स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाचे प्रसंग यांसारख्या विविध विषयांवर आधारित पुस्तकांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वराज्य संस्थापकाच्या कार्याची सखोल माहिती मिळेल आणि त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना अधिक बळकट होईल.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बजरंग गिलडा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायकराव इंगळे उपाध्यक्ष नागनाथ कदम भागवत इंगळे, महेंद्र कदम, रघुनाथ इंगळे, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. पृथ्वीराज धर्मे सरांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि ऐतिहासिक साहित्याबद्दल असलेली आस्था विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.बोरगव्हाण शाळेत वाचन संस्कृतीला चालना देणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक आंतरराष्ट्रीय बोरगव्हाण शाळेत 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली शिवजयंती निमित्त जनरल नॉलेज स्पर्धा घेण्यात आल्या त्यात क्रमांक आलेले विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले तसेच वकृत्व स्पर्धा घेण्यात आले निबंध स्पर्धा घेण्यात आल्या व रंगारंग कार्यक्रम घेण्यात आला व सर्व विजेत्या विद्यार्थ्यास बक्षीस वितरण करण्यात आलं त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले…