दिव्या पावर इलेक्ट्रिकल आयोजित खासदार क्रिकेट चषक स्पर्धेचे बक्षीस वितरण
परभणी,दि 16 ः
साई ओंकारा क्रिकेट क्लब आणि दिव्या पावर इलेक्ट्रिकलचे दीपक जैस्वाल यांच्या वतीने परभणी शहरातील ईदगाह मैदानात खासदार संजय जाधव क्रिकेट चषक 2024 स्पर्धेचे आयोजन बुधवार 11 सप्टेंबर पासून करण्यात आले होते. खासदार क्रिकेट चषक 2024 स्पर्धेत परभणी जिल्ह्यातून 16 क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला होता. आज सोमवार 16 सप्टेंबर रोजी बॉम्बे वॉरियर्स परभणी आणि अमान लाला वॉरियर्स जिंतूर या संघामध्ये अंतिम सामना झाला यामध्ये बॉम्बे वॉरियर्स परभणी हा विजेता झाला.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांच्या हस्ते खासदार क्रिकेट चषक-2024 स्पर्धेचे बक्षीस करण्यात आले. यावेळी साई ओंकारा क्रिकेट क्लब आणि
दिव्या पावर इलेक्ट्रिकलचे दीपक जैस्वाल, शुभम भैय्या पाष्टे, विनोद चव्हाण , सचिन भोजने उर्फ नेता, अंशीराम काळे , अनिस कोसडीकर , सज्जू अली ,आकाश खाटोकर , श्रीकांत लांबाडे , संतोष जयस्वाल ,व्यंकटेश जैस्वाल , अक्षय जैस्वाल, अली खान , वाजेद खान, सचिन धायगुंडे , सचिन शेळके , अजय लोंढे, प्रशांत काळे , अमोल जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खासदार चषक स्पर्धेतील विजेत्या बॉम्बे वॉरियर्स संघास प्रथम बक्षिस 51 हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. तसेच दुसरे बक्षिस अमान लाला वॉरियर्स जिंतूर यासंघास 31 हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. तसेच खासदार चषक स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी खासदार क्रिकेट चषक 2024 स्पर्धेचे अयोजक साई ओंकारा क्रिकेट क्लब आणि
दिव्या पावर इलेक्ट्रिकलचे दिपक जैस्वाल यांनी अशी माहिती दिली आहे की पुढील वर्षी सुध्दा गणेशोत्सवा मध्ये खासदार क्रिकेट चषक स्पर्धेचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात येणार आहे. खासदार क्रिकेट चषक 2024 स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साई ओंकारा क्रिकेट क्लब आणि
दिव्या पावर इलेक्ट्रिकलचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले आहे.