प्रा.संदीप शिंदे यांना पीएचडी प्रदान
परभणी,दि 05 ः
लिमला ता. पूर्णा येथील प्रा. संदीप शिवाजीराव शिंदे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने इतिहास विषयात नुकतीच पीएच.डी प्रदान केली आहे.त्यांनी प्रा. डॉ. जी.एस. पिसे(इतिहास विभागप्रमुख ,ज्ञानोपासक महाविद्यालय,परभणी)यांच्या मार्गदर्शनाखाली “छत्रपती संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक लिखाणाचा चिकित्सक अभ्यास” या विषयांमध्ये आपले संशोधन कार्य पूर्ण केलेले आहे. प्रा. संदीप शिंदे यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल मित्रपरिवार तथा गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.