प्रा.डॉ.व्यंकटेश मोरे यांना जर्मनी सरकारकडून पेटंट प्राप्त

0 231

पुर्णा:(सुशिलकुमार दळवी)
पूर्णा पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील भूमिपुत्र तथा एस.एन.मोर कॉलेज, तुमसर ता.तुमसर जि.भंडारा येथे वाणिज्य विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ.व्यंकटेश दिगंबरराव मोरे यांना जर्मनी सरकारकडून नुकतेच “एकात्मिक पुरस्कार आधारित कार्यबल व्यवस्थापन प्रणाली” (IOT – Integrated Reward Based Workforce Management System) या विषयात पेटंट (Patent) मिळाले.त्यांच्या या यशाबद्दल गोंदिया शिक्षण संस्थेचे अध्यक्षा श्रीमती वर्षाताई प्रफुल्ल पटेल, मा.केंद्रीय मंत्री प्रफुलभाई पटेल, संस्थेचे सचिव मा.आमदार .राजेंद्रजी जैन, संस्थेचे विद्यमान आदर्श संचालक निखिलजी राजेंद्र जैन,महाविद्यालयाचे प्राचार्य सी.बी. मसराम व सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पूर्णा तालुक्यातील सर्व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!