प्रा. श्री. रामेश्वर गटकळ “इंद्रप्रस्थ नॅशनल अवार्ड” ने सन्मानित
सेलू / नारायण पाटील – राजधानी दिल्ली येथे इंटीग्रेटेड ग्लोबल १ फेब्रुवारी २०२५ रोजी युनिवार्सिटी द्वारे भारतातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 30 व्यक्तींचा “इंद्रप्रस्थ नॅशनल अवार्ड” देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील सेलू येथील गटकळ करिअर अकॅडमीचे संचालक प्रा. श्री. रामेश्वर गटकळ यांचाही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इंटीग्रेटेड ग्लोबल यूनिवर्सिटी तर्फे इंद्रप्रस्थ नॅशनल अवार्ड देऊन सन्मान करण्यात आला. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.
हा सोहळा रेडिसन ब्लू, द्वारका, न्यू दिल्ली या पंचतारांकित होटेल मध्ये पार पडला. यावेळी डॉ. दिव्या तणवार ( प्रोफेसर, सोमय्या विद्याविहार, मुंबई), शाम स्वरूप भटनागर ( प्रोफेसर म्यूनिसपल कॉर्पोरेट दिल्ली), डॉ. राम बहाद्दर दुबे ( डीन लखनऊ सेंट्रल संस्कृत यूनिवर्सिटी), महंत नीरज स्वामी जी ( एक्झुटिव्ह मेंबर, राम मंदिर अयोध्या). श्री नीरज कुमार ( सीएमडी इन न्यूज़ 24), श्री. तपन कृष्णन काकाटी (चेअरमन इंटीग्रेटेड ग्लोबल यूनिवर्सिटी, उत्तराखंड), डॉ. शिवाजी शिंदे ( मेंबर ऑफ इंटीग्रेटेड ग्लोबल यूनिवर्सिटी, उत्तराखंड) या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्व सत्कार मूर्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रा रामेश्वर गटकळ सर हे गेल्या कित्येक वर्षांपासून गटकळ अकॅडमी च्या माध्यमातून अत्यंत माफक दरात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना अनेक प्रशिक्षण देऊन तरबेज करतात .त्यांच्या अकॅडमी मधील अनेक तरुण व तरुणी आतापर्यंत मार्गदर्शनाच्या बळावर सैन्य व पोलीस दलात यशस्वीपणे भरती झालेल्या आहेत.योग्य प्रशिक्षण देऊन तरुणांना अधिकारी व पोलीस दलात सहभागी करणारी एकमेव अकॅडमी म्हणून आज तिची सर्वत्र ओळख झाली आहे .
यावेळी प्रा. रामेश्वर गटकळ सर यांनी आपल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल इंटीग्रेटेड ग्लोबल युनिव्हर्सिटीचे आभार मानून समाधान व्यक्त केले. व यापुढेही आपले कार्य निरंतर व यापेक्षा ही अधिक चांगल्या प्रकारे करेन असे मनोगत व्यक्त केले.