प्रा.विजया दाढेल-उफाडे यांना पीएच.डी.
पाथरी / प्रतिनिधी – नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयातील प्रा.विजया भारत दाढेल-उफाडे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून हिंदी विषयात पीएच.डी. प्रदान केली. त्यांनी प्रेमचंद और अण्णा भाऊ साठे के प्रातिनिधिक उपन्यासों में स्त्री चित्रण : एक अध्ययन या विषयावर डाॅ.ज्ञानेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध सादर केला होता.
प्रा.विजया दाढेल यांनी अण्णा भाऊ साठे व प्रेमचंद यांच्या साहित्यातील स्त्रियांच्या संदर्भातील सामाजिक जीवन अधोरेखित केले. विद्यापीठाच्या भाषा संकुल विभागात त्यांची माैखिक परीक्षा पार पडली. यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्रोफेसर हुबनाथ पांडे, डाॅ.दिलीप चव्हाण, प्रोफेसर गाढे, डाॅ.मारोती कसाब, गणपत भिसे, डाॅ.संजय कसाब आदी उपस्थित होते. या यशाबद्दल अनिल नखाते, भावनाताई नकाते, प्राचार्य किशन डहाळे, अँड.अशोक गालफाडे,सुनील लोंढे,विजय वीरकर, गणपत भिसे ,बाबा दाढेल, शिल्पकार मारुती दाढेल आदींनी स्वागत केले.