महिला दिनानिमित्त श्री के बा विद्यालयात कार्यक्रम
सेलू / प्रतिनिधी – आज दि 08 मार्च शनिवारी जागतिक महिला दिनानिमित्त येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी यु हळणे तर प्रमुख पाहुण्या म्हणून लेखिका तथा कवयित्री शुभदा गोळेगावकर,तर जेष्ठ शिक्षक दिलीप बेदरकर,अलका धर्माधिकारी,किशोर खारकर,कीर्ती कुलकर्णी,सुचिता पितळे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी भाग्यवंत यांनी केले.पाहुण्यांचा परिचय जयश्री आडे(सोन्नेकर)यांनी केले.
यावेळी अलका धर्माधिकारी,कीर्ती कुलकर्णी,सुचिता पितळे यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करतांना शुभदा गोळेगावकर म्हणाल्या की,महिलांना संविधानाने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिले.समाजात स्त्रियांना अधिकार हे राज्यघटनेने मिळाले आहेत त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात भारतीय राज्यघटना ठेवणे व त्याचे वारंवार वाचन करणे गरजेचे आहे.महिलांचे सक्षमीकरण होणे आणखी गरजेचे आहे.स्त्रियांमुळे समाज खऱ्या अर्थाने सशक्त होतो.महिलांवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना करणेही आवश्यक आहे.तसेच ” तू जिजाऊ ,तू सावित्री ” ही कविता सादर करून विविध प्रसंग सांगून महिलांबाबत व मुलींना कसे जगावे याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी सर्व महिलांचा शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली कुरुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन धनश्री शिंदे यांनी केले.