तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रॉस्परस इंग्लिश स्कुल,व्हिजन इंग्लिश स्कुल प्रथम

0 0

सेलू(प्रतिनिधी  )दि 19
गटशिक्षणाधिकारी कार्यालय,पंचायत समिती सेलू व श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज दि 19 रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत तर उदघाटक म्हणून जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांची उपस्थिती होती.व्यासपीठावर केंद्रप्रमुख एकनाथ जाधव,संस्थेचे सदस्य डॉ प्रवीण जोग,मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके,प्रभारी मुख्याध्यापिका अलका धर्माधिकारी,आदींची उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके यांनी केले तर मान्यवरांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार योगेश ढवारे,सौ रुपाली कुरुडे यांनी केले.परीक्षक म्हणून संजय चव्हाण,किरण जाधव,सुरेश कवडे, एम.ए.बेग आदींनी काम पाहिले.
या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून 31 शाळा सहभागी झाल्या होत्या तर माध्यमिक गटातून 18 शाळा सहभागी झाल्या होत्या.प्राथमिक शिक्षक गटातून 2 प्रयोग,माध्यमिक शिक्षक गटातून 3 प्रयोग तर प्रयोगशाळा सहायक गटातून 2 प्रयोग सहभागी झाले होते.या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे–
प्राथमिक गटातून प्रॉस्परस इंग्लिश स्कुल,सेलू(प्रथम),शांताबाई नखाते आश्रम शाळा,वालुर(द्वितीय),उत्कर्ष विद्यालय,सेलू(तृतीय)
तर माध्यमिक गटातून व्हिजन इंग्लिश स्कुल,सेलू(प्रथम),प्रिन्स इंग्लिश स्कुल,सेलू(द्वितीय)तर यशवंत विद्यालय,सेलू(तृतीय)क्रमांक पटकावला आहे.
प्राथमिक शिक्षक गटातून ए.एल.अंबेकर, नूतन विद्यालय सेलू (प्रथम)
माध्यमिक शिक्षक गटातून नारायण चौरे,ज्ञानतीर्थ विद्यालय,सेलू(प्रथम)तर प्रयोगशाळा सहायक गटातून एस.जे.शिंदे,शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा ,वालुर (प्रथम) यांनी क्रमांक पटकावला आहे.
यावेळी यशस्वी शाळा व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

error: Content is protected !!