स्वामीनारायण गुरुकुल येथे पाटील परिवार कुलवृत्तांत पुस्तकाचे प्रकाशन
जळगांव – जळगांव जिल्ह्यातील हंबर्डी येथील लेखक खेमचंद पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला २६ डिसेंबर रोजी लेखक खेमचंद पाटील यांनी स्वलिखित पाटील परिवार कुलवृत्तांत या पुस्तकांचे प्रकाशन स्वामीनारायण गुरुकुल येथे व्यकरणाचार्य तथा खान्देश रत्न भक्ति किशोरदासजी शास्त्री यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले त्या वेळेस शाल व सत्संगी जीवनम् हा ग्रंथ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व बोलतांना म्हणाले.
समाजाचे व पाटील परिवाराचे ऋण उतरावं काहीतरी समाजाचे आपण देणे लागतो या उद्देशाने त्यांनी हंबर्डी येथिल पाटील परिवार कुलवृत्तांत या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे ते खूपच प्रशंसनीय आणि वाखाणण्याजोगा आहे , प्रत्येक गावातील प्रत्येक कुटूंबाचा इतिहास अशा पद्धतीचा असावा या हंबर्डी गावामध्ये निवासस्थान करणारा पाटील परिवार व लेवा समाज कुठून केव्हा केव्हा आला आणि त्यांची आता कोणती पिढी आहे हे सगळं आवश्यक आहे कारण येत्या पिढीला या सगळ्या गोष्टींची जाणीव असणे फार गरजेचे आहे. ह्या पुस्तकात आमचे लेखक खेमचंद पाटील यांनी फार सुंदर असं कुलदेवता, गोत्र , देवाचा दिवस यासह नेमका काय पूजा विधी आपल्या आपल्या परिवारात केलं जातं त्या सगळ्या गोष्टींचा समावेश या पुस्तकांमध्ये त्यांनी घेतला आहे.
अशा या पुस्तकांची सध्याच्या काळात गरज आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी त्यांच्या आजी आजोबांच्या आत्म्यास समर्पित केलेले आहे. त्यापेक्षाही उत्तम गोष्ट आहे पण आजकाल मुलं शिकून सोडून भरकटत जातात त्यापेक्षा खेमचंद पाटील सारखा तरुण नक्कीच समाजासाठी व संपूर्ण परिवाराला परिवाराला उपयोगाचा आहे. पण त्यापेक्षाही धन्यवाद त्याच्या आई-वडिलांना अशा सुंदर सुपुत्राला आपण जन्म दिला तो खरोखरच सार्थक आहेत.
त्यावेळेस भक्ती स्वरूपदासजी शास्त्री व पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते. त्या वेळेस खेमचंद पाटील बोलतांना म्हणाले की पाटील परिवारात तसेच लेवा पाटील समाजात जन्माला आल्याचा मला सार्थ अभिमान आहेत. आणि मी माझ्या परिवाराचे आणि समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने पाटील परिवार कुलवृत्तांत या पुस्तकाचे लिखाण करून माझ्या पूर्वजांच्या नावाचे स्मरण होऊन त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी .
माझ्या लिखाणाची परिवारासह समाजाच्या इतिहासात जेव्हा नोंद ठेवली जाईल त्याच दिवशी माझ्या जगण्याचे सार्थक होणार या उद्देशाने हंबर्डीतील पाटील परिवारास हा कुलवृत्तांताचे लिखाण केले आहे.