चैतन्य दिवाळी विशेषांक २०२२ चे प्रकाशन

0 67

माऊली उद्यानातील सभागृहात प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी मा. बाबू डिसोजा यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघाच्या अध्यक्षा मा. चांदबी सय्यद होत्या.

 

उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोशी यांनी प्रमुख पाहुणे श्री. बाबू डिसोजा यांचा परिचय करून दिला. दिवाळी अंकाचे जाहिरातदार, आश्रयदाते यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

 

पत्रकार मा. प्रदीप गांधलीकर, मा. शैलजाताई मोरे, भारती फरांदे, बाबर, सलीम शिकलगार, आर एस कुमार , सुभाष जोशी, आशा नष्टे, गुणवंत चिखलीकर, आनंदराव मुळुक, माधुरी डिसोजा, रजनी शेठ, यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित ज्येष्ठ नागरिक, मान्यवरांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
कार्याध्यक्षा मा. अर्चना वर्टीकर यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.

error: Content is protected !!