पूर्णेत हिंदु समाजाने काढला निषेध मोर्चा,जाळला पुतळा

0 5

पूर्णा,दि 10ः
पुर्णा शहरातील सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने बांगलादेशाचे राष्ट्रपती मोहम्मद युनूस यांचा पुतळा जाळून केला जाहीर निषेध

बांगलादेश मधील हिंदू बांधवावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात व आज सकल हिंदू बांधवांना वतीने हिंदू बांधवांना तात्काळ सुरक्षा देऊन न्याय द्यावा या मागणीसाठी सकाळी दहा वाजता श्रीराम मंदिर पूर्णा येथे हनुमान चालीसा पठण करून प्रभू श्रीरामाची आरती करून मोर्चा सुरुवात झाली हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार का घालून पुढे आगेकूच करत महात्मा बसवेश्वर चौक, कमाल टॉकीज ,आनंदनगर ,ते धर्मवीर संभाजी महाराज चौक, येथे सांगता करण्यात आली यावेळी उपस्थिती काही समाज बांधवांनी दोन शब्द मनोगत व्यक्त केले व प्रशासनाच्या वतीने सकल हिंदू समाज बांधवांचा तहसीलदार यांनी निवेदन स्वीकार करून घेतले यानंतर सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद युनुस यांचा पुतळा जाळून जाहीर निषेध व्यक्त केला

error: Content is protected !!