लोकसभेसाठी अजित पवार गटातील संभाव्य उमेदवार म्हणून राजेश विटेकर यांचे नाव निश्चीत

0 238

कैलास चव्हाण
परभणी,दि 17 ः
आगामी लोकसभा निवडणुकांची चाहुल लागत असुन निवडणुकांच्या  पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.  महायुतीत लोकसभेच्या नऊ जागांसाठी राष्ट्रवादीचा अजित पवार  गट आग्रही आहे.राष्ट्रवादीकडील चार  जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागांची घटक पक्षांकडे मागणी केली आहे.  अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात चाचपणीच्या सूचना दिल्या आहेत.परभणीत महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांचे नाव निश्चीत झाले आहे.

पुर्वीच्या  महायुतीत परभणी लोकसभा मतदार संघ शिवसेनेला तर आघाडीत राष्ट्रवादीला  आहे. परंतु मागील वर्षभरात संपूर्ण समिकरणे बदलली आहे. शिवसेनेत दोन गट तर राष्ट्रवादीत देखील दोन गट पडले आहेत.शरद पवार यांचा गट शिवसेना ठाकरे गट व कॉंग्रेस सोबत आहे.तर अजित पवार यांचा गट सत्ताधारी भाजपा-शिंदे शिवसेना यांच्यासोबत आहे.त्यामुळे महायुतीसमोर देखल परभणीसह अनेक जागांवरुन पेच निर्माण झाला आहे.अशात अजितदादा गटाचे संभाव्य उमेदवार जाहीर झाले आहेत.त्यात आपेक्षेप्रमाणे परभणीत राजेश विटेकर यांचे नाव निश्चीत झालेआहे.
राजेश विटेकर यांची मतदारसंघावर पकड
राजेश विटेकर हे राष्ट्रवादी कॉग्रेसचे परभणी जिल्ह्यातील नेते म्हणून ओळखले जातात. वडिल माजी आमदार उत्तमराव विटेकर यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला.  विटा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच म्हणून त्यांनी राजकारणाला सुरूवात केली. सोनपेठ बाजार समितीचे सभापती ते परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.
राजेश विटेकर हे दोन्ही पवारांच्या जवळचे मानले जातात.खासकरुन अजित दादांचे यांचे ते विश्वासु म्हणून ओळखले जातात.2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने थेट त्यांना मैदानात आणुन तक्तालीन महायुतीला घाम फोडला होता.एक मितभाषी,सर्वसमावेशक चेहरा,मतदार संघाची खडानखडा माहीती,कार्यकर्त्याचे जाळे,जमिनीवर पाय ठेवणारा नेता म्हणून राजेश विटेकरांची ओळख आहे.त्यामुळे 2019 मध्ये 4 लाख 96 हजार 742 एवढी भरघोस मते मिळवली.या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला.तरी देखील त्यांनी हार न मानता आपली घोडदौड सुरु ठेवली.जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक, बाजार समितीचे सभापती अशी सहकार क्षेत्रात देखील त्यांची पकड आहे.राष्ट्रवादीच्या युवा वर्ग त्यांचा चाहता आहे.

नऊ जागेवर अजित पवार गट अग्रही
सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत. या जागा सोडून  अजित पवार गट धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा गोंदिया,  छत्रपती संभाजीनगर या पाच जागांसाठी आग्रही आहे.दरम्यान लोकसभेच्या निवडणुका या कधीही जाहीर होऊ शकतात.  त्यामुळे अजित पवार  गटही आता लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागलं असल्याचं पाहायला मिळतंय.

संभाव्य उमेदवारांची नावे

  • बारामती – सुनेत्रा पवार
  • सातारा – रामराजे नाईक निंबाळकर
  • रायगड – सुनिल तटकरे
  • शिरूर – शिवाजीराव आढळराव पाटील
  • दक्षिण मुंबई – काँग्रेसमधील बडा चेहरा
  • परभणी- राजेश विटेकर
  • भंडारा गोंदिया – प्रफुल्ल पटेल
  • धाराशिव – राणा जगजितसिंह
  • छत्रपती संभाजीनगर – सतीश चव्हाण

 

error: Content is protected !!