साडेगाव येथे रासेयोचे पशू तपासणी शिबिर संपन्न
परभणी, प्रतिनिधी – साडेगाव येथे श्री शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि पशुवैद्यकीय दवाखान्याच्या संयुक्त विद्यमाने पशु तपासणी, लसीकरण शिबिराचे आयोजन मंगळवार (दि.२२) रोजी करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ९ ते १२ दरम्यान गावातील पशुसाठी पशु तपासणी, औषधोपचार व लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी गावातील पशु॑ची तपासणी करून त्यांना योग्य औषधोपचार तसेच लसीकरण करण्यात आले.
याप्रसंगी ९५ पशुची तपासणी करून त्यांना औषधोपचार व लसीकरण करण्यात आले. साडेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. पी.एम. भिसे,परिचर राजेश घाडगे, राहुल डूबे यांनी पशुंची तपासणी केली. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.तुकाराम फिसफिसे, प्रा. राजेसाहेब रेंगे या॑च्यासह गावकरी, रासेयो स्वयंसेवकाची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.