श्री शिवाजी महाविद्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेस प्रतिसाद

0 21

परभणी – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि.१५) रोजी आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रंचड प्रतिसाद मिळाला.

 

सदरील कार्यशाळेसाठी पुणे येथील एनडीआरएफच्या पाचव्या बटालियनच्या चमूने मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, मुख्य मार्गदर्शक निरीक्षक ईश्वर मते , लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ तसेच एनडीआरएफचे जवान उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन खांडके यांनी केले. ईश्वर मते आणि त्यांच्या चमूने उपस्थित विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनात युवक स्वतःची, समाजाची आणि राष्ट्राची कशाप्रकारे मदत करू शकतो याबाबतीत वेगवेगळे प्रात्यक्षिक करून दाखविले. भूकंप ,महापूर ,सर्पदंश, हृदयविकार, रस्ते अपघात याबाबतीत प्राथमिक सावधानता कशी बाळगावी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

 

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. युवकांनी समाजात चांगल्या कार्यासाठी सक्रिय राहणे आवश्यक आहे. कोणत्याही संकटावर युवकांनी मात केली पाहिजे अशी भूमिका त्यांनी विशद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रशांत सराफ यांनी केले आभार डॉ. प्रल्हाद भोपे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. राजेसाहेब रेंगे, सुरेश पैदापल्ली, साहेबराव येलेवाड आदींनी पुढाकार घेतला. कार्यशाळेस एनसीसी, रासेयोचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!