सेलू शहरात दलित समाजाच्या हक्काची पायमल्ली; दलित वस्तीमध्ये विकास कामे बंद
सेलू / प्रतिनिधी – शहरात लोकप्रतिनिधी तथा नगर परिषदेकडून जाणीवपूर्वक दलित समाजावर अन्याय केला जात असून त्यांच्या हक्काची पायमल्ली होत आहे .याच्या निषेधार्थ समाज बांधव व तरुणांनी नगर परिषदे समोर धरणे आंदोलन चालू केले आहे .
विकास कामात हक्काबाबत दलित समाजाला जाणीवपूर्वक डावलले जात असून दलित वस्ती चा निधी शहरात इतरत्र सधन वस्तीत स्वतःच्या हितासाठी वापरला जात आहे .शहरात सध्या चालू असलेल्या मोठमोठ्या विकास कामात दलित वस्तीचा समावेश नाही .
शहरातील कांही ठराविक मंदिरांना निधी मिळत आहे .परंतु शहरातील गायत्री नगर ,आंबेडकर नगर ,सर्वोदय नगर ,भीम नगर भागात विकास निधी का दिला जात नाही .हा एक प्रकारे दलित समाजावर अन्यायच आहे .पैशावर सत्ता व सत्तेतून पैसा असा प्रकार सर्रास सुरू आहे .
सर्व दलित वस्तीमध्ये विकास कामे सुरू करा
सर्व दलित वस्ती मध्ये समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी
रस्ते ,नाल्या उद्यान तसेच विहारासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची संपूर्ण जागा तात्काळ वाढवून विकास करावा
या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदनावर विनोद धापसे ,विकास धापसे ,सागर गायकवाड ,कपिल धापसे ,रोहन आकात ,सुमित साळवे,ऋतिक सावंत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.