सेलूत घुमला ” हर हर महादेव ” नामाचा गजर
सेलू ( प्रतिनिधी )
शहरातील श्री साईबाबा मंदिर महेश नगर सेलू येथील महाशिवरात्री निमित्य आयोजित भगवान महेशश्वर शिवलिंगाचा ३५१ जोडप्यांच्या हस्ते महा अभिषेक सोहळा संपन्न झाला. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी आयोजित केलेल्या या अभिषेक सोहळ्यास शहरातील सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक, धार्मिक,राजकीय, क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित करून अभिषेक करण्यास पत्रिका,फोन लावून व व्हाट्सअप वर मेसेज पाठऊन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आणि या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाअभिषेक सोहळ्यास शहरातील ३५१ जोडप्यांनी महा अभिषेक केला तसेच सर्व यजमानांच्या हस्ते महाआरती चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहरातील हजारो भावी भक्त उपस्थित होते महाशिवरात्रीच्या पावनदिनी भगवान महेश्वर शिवलिंगाच्या अभिषेकाचा यजमानपद माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या पुढाकारातून साकार झाले असून त्यानिमित्त सर्व भाविक भक्तांनी यांचे अभिनंदन केले
पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या वतीने देण्यात आले होते तसेच सर्व साहित्य प्रसाद म्हणून सोबत घेऊन जाण्यास सांगितले
कार्यक्रम यशस्वि करण्यासाठी विनोद बोराडे मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले