बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सेलूत हिंदूंकडून संताप

0 0

सेलू(प्रतिनिधी)दि 10
बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार,हिंदूंच्या मंदिरांवर होणारे हल्ले याच्या निषेधार्थ आज दि 10 रोजी सकल हिंदू समाजाने भव्य मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त करत हिंदूंचे संरक्षण व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे .
बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत.त्यांचे मानवाधिकार,मालमत्ता,जीवांचे हनन होत आहे.गेल्या काही महिन्यात हिंदू मंदिरांवर हल्ले,तोडफोड,अबालवृद्ध व महिलांवर देखील अत्याचार होत आहेत.यामुळे बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.याकडे बांगलादेश शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे निवेदनात नमूद केले आहे.त्यातच इस्कॉनशी संबंधित चिन्मय कृष्ण महाराज यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून जबरदस्तीने अटक केली आहे.तसेच कारागृहात त्यांच्या जीवाला धोका आहे असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.त्यामुळे सरकारने तातडीने बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार,मंदिरावर होणारे हल्ले थांबवण्यासाठी तातडीने पाऊले उचलावी आणि हिंदू धर्मचार्यांना केलेली बेकायदेशीर अटक रद्द करून तातडीने त्यांची सुटका करावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रशासनामार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते क्रांतिचौक मार्गे भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.यावेळी हिंदूंनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
या भव्य मोर्चामध्ये शहरातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते , प्रतिष्ठित नागरिक ,वकील , डॉक्टर ,व्यापारी ,विद्यार्थी तसेच गटकळ अकॅडमी चे विद्यार्थी गणवेशात सहभागी झाले होते .महिलांचा देखील यामध्ये सहभाग लक्षणीय असाच होता .
निषेधार्थ शहरातील सर्व प्रतिष्ठाने ,शाळा तसेच छोटे व्यापारी देखील आपले व्यवहार बंद करून या मोर्चात सहभागी झाले होते .अत्यावश्यक सुविधा वगळता सेलू शहर जवळपास बंद होते .

error: Content is protected !!