उबाठाचे संजय उर्फ बंडू जाधव यांच्या विजयानिमित्त सेलूत आनंदोत्सव साजरा

0 52

 

सेलू / प्रतिनिधी – नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांनी लाखोंच्या मताधिक्याने विजय संपादन करून विजयाची हैड्रिक साधल्याबद्दल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी येथील क्रांती चौकातील मशालीला स्वच्छ धुऊन काढून दुधाचा अभिषेक करून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला .

 

यावेळी महाविकास आघाडीचे माजी जी प सभापती अशोकराव काकडे ,माजी नगराध्यक्ष पवन आडळकर ,शिवसेना शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक मनीष कदम ,रघुनाथ बागल ,विनोद तरटे ,संभाजी पवार ,शेख दिलावर ,गौस लाला ,परवेज सौदागर ,समीर शेख ,अशोकराव उफाडे ,रफीक भाई ,नरसिंह हरणे यांच्या सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

error: Content is protected !!