संस्काराच विद्यापीठ म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब- हभप अच्युत महाराज दस्तापुरकर
परभणी,दि 12 (प्रतिनिधी)ः
संस्काराची पहिली गुरू माता. त्या मातृत्वाच्या आशीर्वादानेच अनेक मोठमोठे योद्धे तयार झाले. संत ज्ञानेश्वर महाराज देखील रुख्मिनी मातेच्या संस्कारानेच मोठे झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या आशीर्वादाने आणि संस्कारातून रयतेचे राज्य उभारले. म्हणूनच संस्काराचे खरे विद्यापीठ म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब असे प्रतिपादन हभप अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी केले. वसमत रोडवरील आसोला परिसरात असलेल्या जिजाऊ संस्थान येथे शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या नियोजनातुन जिजाऊ संस्थानच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सकाळी 8 वाजता महिला,मुली, पुरुष यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जिजायणचे वाचन करण्यात आले. त्यानंतर दुपारी 1 वाजता राष्ट्रमाता जिजाऊ यांची हभप अच्युत महाराज दस्तापुरकर,हभप बालासाहेब मोहिते महाराज हभप पुरुषोत्तम महाराज झाडगावकर जिजाऊ संस्थांन अध्यक्ष डॉ. जगन सरकटे, सचिव डॉ.रुस्तुम भालेराव, शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे,धम्मदीप रोडे,सुभाष जावळे,सोपानराव शिंदे,नितेश देशमुख
यांच्या हस्ते पूजन करुण पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर स्नेहल हारकळ हिने सामूहिक जिजाऊ वंदना घेतली.यावेळी हभप अच्युत महाराज दस्तापुरकर पुढे बोलताना म्हणाले कि
मातृत्वाच्या संस्काराशिवाय माणूस मोठा होत नाही. हरिभक्त पारायण नाही झाले तरी चालेल परंतु कर्तव्य पारायण व्हावे. मातृत्वाच्या आशीर्वादाशिवाय कर्तव्य पारायण होत येत नाही. जिजाऊ मंदिराच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावेत असे आवहान हभप अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी केले. याप्रसंगी हभप बालासाहेब मोहिते महाराज यांनी देखील गावागावातील सप्ताहातून जिजाऊ मंदिरासाठी निधी उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या सोबतच हभप पुरुषोत्तम महाराज झाड़गावकर यांनी देखील जिजाऊ मंदिराच्या विकासासाठी कीर्तनाच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी व्यंकटराव शिंदे यांच्याकडून लाडूचे वाटप करण्यात आले. तसेच वधू-वर परिचय पत्रिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले.राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यासाठी जिजाऊ संस्थानचे सदस्य अशोक रसाळ,धाराजी भुसारे,रामदास अवचार, नितेश देशमुख ,रामप्रसाद रणेर,प्रदीप भालेराव,अक्षय देशमुख,गजानन जोगदंड, सचिन पाटिल,नरेश खैराजांनी,विठ्ठल तळेकर,अरुण पवार,माउली दुधाटे, नितिन सावंत,प्राचार्य राम रेंगे,रामप्रसाद अवचार, बाळासाहेब पानपट्टे, नितिन देशमुख,गणेश सुळ,भरोसे, जावळे,आदिसह पंचक्रोशीतील शिवभक्त महिला, पुरुष,विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.