संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या,सेलूत मागणी

1 97

सेलू ( प्रतिनिधी )
बीड जिल्हयातील सामाजिक कार्यकर्ते व मराठा सेवक समाजाचे सक्रीय सेवक मस्साजोग ता.केज येथील संतोष देशमुख यांचे दिनांक ०९/१२/२०२४ रोजी अपहरण करून त्यांचा निघृणपणे खुन करण्यात आला आहे. सदरची घटना अत्यंत निंदनीय असून खुन झाल्यानंतरही गुन्हा नोंद करण्यास जातीयवादी मानसिकतेचे अधिकारी यांचे दुर्लक्षामुळे घडली आहे. बीड जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आहे. या घटनेचा सेलूत तीव्र निषेध करण्यात आला असून संतोष देशमुख खुन प्रकरणातील आरोपींना त्वरीत अटक करण्यात यावी तसेच या प्रकरणाचा तपास CID मार्फत करण्यात येवून प्रकरण जलदगती न्यायालया मार्फत चालविण्यात यावे. प्रकरणातील आरोपी यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा या प्रकरणी आम्हाला भविष्यात तीव्र आदोलन करावे लागेल.अशी मागणी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे पोलीस निरीक्षक सेलू यांच्या मार्फत निवेदनाद्वारे सकल मराठा समाज, सेलू जि.परभणी यांच्या वतीने करण्यात आली आहे.यांचे हत्येचा तपास CID मार्फत करून प्रकरणातील दोषीविरूध्द केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

 

error: Content is protected !!