सर्वांच्या सहकार्याच्या बळावरच क्रिकेट स्पर्धेची रोप्यमहोत्सवी वाटचाल-माजी आ.हरिभाऊ लहाने
सेलू ( नारायण पाटील )
माननीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २५ वर्षांपूर्वी नितीन व्यायामशाळा ,कला ,क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या ” नितीन चषक ” क्रिकेट स्पर्धेचे हे रोप्य महोत्सवी वर्ष साजरे होत असून सर्वांच्या सहकार्याच्या तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाच्या बळावरच स्पर्धेची ही वाटचाल चालू आहे . या स्पर्धेच्या नियोजनाबाबत विशेष सहकार्य केलेल्या कै गिरीश लोडया यांची आठवण मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने नेहमीच होते .यावेळी या स्पर्धेचे रोप्य महोत्सवी साजरे होत असून स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात येणाऱ्या १६ संघांपैकी मराठवाड्यातील ८ तर बाहेरील ८ नामवंत संघाचा समावेश राहणार आहे .केवळ ग्रामीण भागातील खेळाडूंना आपल्यातील कला गुणांना वाव देता यावा व तालुक्यातील क्रीडाप्रेमींना चांगल्या स्पर्धा पहावयास मिळाव्यात हा आपला स्पर्धा सुरू करण्यामागील उद्देश होता .व त्यासाठी सर्वांनी बहुमोल असे सहकार्य केल्यामुळेच गेल्या २५ वर्षांपासून स्पर्धेचे सातत्य त्याच उत्साहात टिकून आहे .असे प्रतिपादन स्पर्धेच्या धावपट्टीच्या उदघाटन प्रसंगी शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी केले .
१५ ते २३ जानेवारी या दरम्यान या स्पर्धा संपन्न होणार असून अनेक मान्यवर यामध्ये उपस्थिती लावणार आहेत .
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष मा .आ .हरिभाऊ लहाने होते तर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर ,जेष्ठ पत्रकार नारायण पाटील ,डॉ ,बाळासाहेब जाधव ,डॉ अशोक नाईकनवरे ,डॉ ज्ञानेश्वर कारके ,ऍड शिवाजी चौरे ,अरिहांत गॅस एजन्सी चे पारस काला ,अप्पू सोळंके आदींची प्रमुख उपस्थिती होती .
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
यावेळी प्रा नागेश कान्हेकर यांनी स्पष्ट केले की ,केवळ आवडी पोटी मा .आ. हरिभाऊ लहाने यांनी सहकार्याच्या बळावर अत्यंत कठोर परिश्रम घेऊन या राज्यस्तरीय क्रेकेट स्पर्धेचे सातत्य टिकवले आहे.व यावर्षी तर या स्पर्धेचे रोप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे मोठ्या उत्साहात या स्पर्धा होणार आहेत.परितोषकांची रक्कम देखील यावेळी वाढवली असून प्रथम परितोषक २ लाख रुपये व चषक असून द्वितीय परितोषक १ लाख रुपये व चषक ठेवण्यात आलेले आहे .तसेच मालिका वीर म्हणून २१,०००/- रुपयाचे परितोषक राहणार आहे .दररोज मॅन ऑफ द मॅच ,बेस्ट बॉलर ,बेस्ट बॅट्समन ,बेस्ट क्षेत्ररक्षण अशी विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहे .
यावर्षीच्या स्पर्धेत विशेष परितोषक प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आले असून दररोज एका प्रेक्षकाला ड्रॉ द्वारे एक सायकल दिली जाणार आहे .खेळाडूंना परितोषक सर्वच ठिकाणी दिली जातात परंतु प्रेक्षकांना परितोषक देणारी राज्यातील ही पहिलीच क्रिकेट स्पर्धा ठरणार आहे . या स्पर्धा ड्रेस कोड मध्ये खेळवल्या जाणार असून टीमची निवास व भोजन व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे .
ऍड शिवाजी चौरे यांनी देखील यावेळी मनोगतातून हरिभाऊ काका यांनी यांच्या कडून २५ वर्षांपूर्वी लावलेला हा छोटे रोपटे आज महाकाय वटवृक्ष बनले आहे .अर्थात यासाठी हरिभाऊ लहाने यांचे परिश्रम मोलाचे असल्याबद्दल कौतुक करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले .
यानंतर प्रत्यक्ष धावपट्टीवर जाऊन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून उदघाटन करण्यात आले .
या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे सर्व सदस्य व संदीप लहाने मित्र मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत .