जिजामाता बाल विद्या मंदिर मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
सेलू ( नारायण पाटील )
आज दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी जिजामाता बाल विद्या मंदिर येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली, यानिमित्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्था सचिव दिगंबरराव मुळे, तर प्रमुख अतिथी म्हणून मधुकर नाना पौळ, दीपक निकाळजे, पुंजाराम निर्वळ यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रातीनिधिक स्वरूपात श्री पुंजाराम निर्मळ यांनी सावित्रीची लेक म्हणून कुमारी पायल धापसे हीचे पुष्पहार घालून पूजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाठक यांनी केले, पौळ नाना यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच पुंजाराम निर्वळ यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, अध्यक्षीय समारोप दिगंबरराव मुळे यांनी केला, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.