धनेगाव येथे मल्लिका देवी संस्थानात शालेय साहित्य वाटप
सेलू ( नारायण पाटील)
तालुक्यातील धनेगाव येथील मल्लिका देवी संस्थानात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महापंगत नगरभोजन आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. चौधरी घराण्याचे कुलदैवत असलेल्या श्री मल्लिका देवीची उपासना मागील ८० वर्षांपासून अखंडपणे केली जात आहे. स्व. श्री शंकरराव चौधरी यांचा पवित्र वारसा पुढील पिढीने समर्थपणे पुढे नेत सामाजिक व धार्मिक उपक्रमांची परंपरा टिकवली आहे.
यावर्षीच्या कार्यक्रमात मंदिर परिसरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक विद्यालयात सुमारे १५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची आवड वाढेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास सरपंच देविदास मगर, प्राचार्य श्री मुख्याध्यापक ताराचंद चव्हाण , सहशिक्षक विजय गंगाधरराव जोशी सर यांच्यासह चौधरी परिवारातील डॉ. दत्तात्रय चौधरी, LIC चे ब्रांच मॅनेजर मिलिंद चौधरी, हृदयरोग तज्ञ डॉ. महेश चौधरी, टाटा ट्रस्ट मुंबई चे इंजिनिअर सुनील चौधरी, उद्योजक अमित चौधरी, प्रगती शील शेतकरी लक्ष्मीकांत चौधरी तसेच शिवसेना नेते व नगरसेवक आलोक चौधरी आदि चौधरी चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते. चौधरी ट्रस्ट पुराण वास्तू संरक्षण संवर्धन, personality development, camp रोजगार मार्ग दर्शन स्वाभिमान जागृत करून आत्मनिर्भर व्यक्ती बनविण्यासाठी काम करत आहे