माजी आमदार हरिभाऊकाका लहाने यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठांसाठी आसन व्यवस्था
सेलू ( नारायण पाटील )
पाथरी विधानसभेचे माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे हिंगोली विधानसभा प्रमुख मा हरिभाऊ काका लहाने यांचा वाढदिवस आज मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला .सकाळ पासूनच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती .
बंडू ( महादेव )देवधर यांच्या वतीने येथील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर लहाने यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . हरिभाऊ काका लहाने यांच्या हस्ते यावेळी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी न्यू हायस्कुल शाळेच्या निवृत्त शिक्षिका तथा हरिभाऊ काका लहाने यांच्या शिक्षिका असलेल्या लक्ष्मीबाई भागवत यांच्या हस्ते लहाने काकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आली आला .यावेळी लहाने यांचा फेटा बांधून तसेच फटाक्यांच्या अतिषबाजी व वाजंत्री लावून वाढदिवसाचा केक कापण्यात आला .
यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती मा हरिभाऊ काका लहाने , श्रीमती लक्ष्मीबाई भागवत , श्रीमती अनुपमा देवधर व संतोष कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी पत्रकार संघटना परशुराम संघटना तसेच अनेक मान्यवरांनी पुष्पहार घालून तसेच बुके देऊन हरिभाऊ काका लहाने यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या .
यावेळी लहाने यांच्या हस्ते टिळकांच्या पुतळ्यासमोर जेष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्थेची सोय व्हावी यासाठी बंडू देवधर यांच्या सौजन्याने बसवण्यात आलेल्या ४ सिमेंट बाकांचे लोकार्पण करण्यात आले .लवकरच या ठिकाणी जेष्ठ नागरिकांसाठी वाचनालयाची संकल्पना बंडू देवधर यांची असल्याचे सांगण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यू हायस्कुल शाळेचे शिक्षक धनंजय भागवत यांनी केले .तर बंडू देवधर यांनी उपस्थितांचे आभार मानले .
यानंतर केशवराज बाबासाहेब विद्यालयात देखील संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव महेशराव खारकर यांनी लहाने काका यांचा शाल ,श्रीफळ देऊन सत्कार केला .यावेळी मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके व बालासाहेब हळणे तसेच शिक्षकांच्या वतीने नरेश पाटील व संजय धारासुरकर यांनी पुष्पहाराने लहाने काका यांचा सन्मान केला .हरिभाऊ काका लहाने व केशवराज बाबासाहेब विद्यालयाचा संबंध पूर्वीपासूनच घनिष्ठ असून संस्थेचे माजी सचिव कै .वसंतराव खारकर व लहाने काका यांचे देखील अतूट संबंध होते .त्यामुळे दरवर्षी वाढदिवसानिमित्त शाळेत काकांचा सत्कार होतो .व त्यांचे देखील या संस्थेकडे विशेष लक्ष असल्याचे यावेळी सुत्रसंचलनात नरेश पाटील यांनी स्पष्ट केले .