सेलूच्या भावना चौधरी यांची कर सहाय्यक पदी निवड
सेलू ( नारायण पाटील)
नुकत्याच लागलेल्या निकालांमध्ये एमपीएससी द्वारे घेण्यात आलेल्या ग्रुप – C परीक्षांमध्ये गटकळ करिअर अकॅडमी ची विद्यार्थिनी कु. भावना कैलासचंद चौधरी यांची कर सहाय्यक व महसूल सहाय्यक पदी निवड झाली. याबद्दल त्यांचा अकॅडमी तर्फे जोरदार सत्कार करण्यात आला. तिच्या या नियुक्तीमुळे सेलू तालुक्यातून सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.
सेलू शहरातील मठगल्ली येथे राहणाऱ्या भावना कैलासचंद चौधरी यांनी सेलू येथील गटकळ अकॅडमी जॉईन करून योग्य मार्गदर्शन घेतले आणि दिलेल्या परीक्षेतील घवघवीत यश संपादन केले आहे. या सत्कार सोहळा निमित्त अकॅडमीचे संचालक प्रा श्री रामेश्वर गटकळ सर, प्रा श्री दीपक गटकळ, सत्कार मूर्ती भावना चौधरी यांचे मामा श्री दिलीप चोयल, श्री मोहन चोयल, नयना चोयल अकॅडमीतील सर्व स्टाफ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिद्द, चिकाटी, मेहनत व त्याचबरोबर सातत्य टिकून ठेवलं तर तुम्ही यशाला नक्कीच गवसणी घालू शकता असं आपले मनोगत व्यक्त करताना भावना चौधरी यांनी सांगितले.