राष्ट्रीय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा सेलूच्या पाच खेळाडूची निवड
सेलू / नारायण पाटील – १७ वी राष्ट्रीय सबज्युनियर व ज्युनिअर फ्लोअरबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा कन्याकुमारी (तामीळनाडू) येथे दि. २५ ते २९ जानेवारी दरम्यान संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र राज्य संघात स्पर्धेसाठी नूतन विद्यालय सेलू येथील खेळाडू अजय नारायण चव्हाण, गौरव गजानन चाळके, ऋषिकेश कुंडलिकराव मानवतकर, करण रामदास गोरे, जीवन बाळू काजळे यांची निवड झाली. खेळाडूंना शुभेच्छा देतांना मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील, पर्यवेक्षक के.के. देशपांडे, क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, क्रीडा शिक्षक संजय भुमकर.
या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, संस्था अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, सचिव डॉ.व्हि.के. कोठेकर, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, राज्य सचिव रवींद्र चोथवे, पर्यवेक्षक डी.डी. सोन्नेकर, जिल्हा सचिव प्रशांत नाईक, बाळू बुधवंत, आदी अभिनंदन केले.