महा ई सेवा व आधार केंद्र संघटन जिल्हाध्यक्षपदी सुहास पंडित यांची निवड
परभणी,दि 13 ः
अखिल स्तरीय महा ई सेवा व आधार केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक 9 व 10 फेब्रुवारी दोन दिवस राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन पालघर व मुंबई येथे करण्यात आले होते .या बैठकीमध्ये परभणी जिल्हाध्यक्ष पदी इंजि. सुहास पंडित व महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी म्हणून संतोष भावानकर यांची नियुक्ती करण्यात आली.सदरील नियुक्ती पत्र मा.विनोद तायडे, शैलेन्द्र भोईटे , यशवंत गावंडे, रियाज तांबोळी, कुंदन कोरडे जयश पाटील व कामिनी रानडे यांच्या उपस्थित देण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यातील महा ई सेवा व आधार केंद्र पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.ही महत्वपूर्ण बैठक हॉटेल रमणीय रेसिडेन्सी, केळवा, ता. जि. पालघर येथे पार पडली. बैठकी मध्ये महा ई सेवा व आधार केंद्रांसमोरील अडचणी, सवलती, शासन धोरणे आणि भविष्यातील वाटचाल यासंदर्भात चर्चा करण्यात आली. परभणी जिल्ह्यातील केंद्राचालंकाच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून सर्वाना सोबत घेऊन संघर्ष करणार तसेच शासनाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सोबत समन्वय ठेवून व शासकीय नियमाचे काटेकोरपणे पालन करत जिल्ह्यातील नागरिकांना सेवा पुरवणार असे विचार सुहास पंडित यांनी मांडले.
कार्यक्रमास राज्यातील विविध जिल्हय़ातील संघटनेचे राज्य प्रतिनिधी, जिल्हा अध्यक्ष व महा इतर पदाधिकारी उपस्थित होते.