स्व.डॉ. पांडुरंग नावंदर ज्युनिअर जिनियस विभागीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत नूतन विद्यामंदिर हायस्कूल सर्वप्रथम

0 2

परभणी : शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल, नानलपेठ येथे संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. डॉ. पांडुरंग नावंदर यांच्या जयंतीनिमित्त बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्यावतीने ज्युनिअर जिनियस विभागीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत मराठवाडा विभागातून 28 संघाने सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार झरकर हे होते. तर उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. विलासराव पोहंडुळकर , संस्थेचे कोषाध्यक्ष श्री विनय नावंदर , सहसचिव ऍड. संजय देशपांडे , सदस्य पवनकुमार झांजरी , श्री एम. जी. विहिटकर , सौ. डॉ. अनिता विवेक नावंदर , सौ. निर्मला विनय नावंदर , मुख्याध्यापक श्री अरुण बोराडे , उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार , पर्यवेक्षक प्रदीप रूघे , बळीराम कोपरटकर , सीमा बोके , प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सिंधू शर्मा , बाल विद्याविहारचे मुख्याध्यापक विनायक लोखंडे , बालविद्यावर्धिनीचे मुख्याध्यापक रमेश कापसे आदी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. विवेक नावंदर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आव्हाने लक्षात घेऊन ज्ञानाचा योग्य वापर करून गुणवत्ता सिद्ध करावी, व जगाच्या स्पर्धेत टिकावे.
प्रसंगी विलास पोहंडुळकर यांनी स्व. डॉ. पांडुरंग नावंदर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या कार्यास पुढे नेणे व विद्यार्थी हित जपणे हेच आपले ध्येय असावे, असे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. झरकर म्हणाले की, शिक्षकांनी शिस्त , संलग्नता , विकास व गुणवत्ता या गोष्टी अंगी बाळगून विद्यार्थ्यांचा विकास घडवावा. विद्यार्थ्यांमध्ये एकरूप होऊन विद्यार्थ्यांना जगाच्या स्पर्धेत उभा करावे.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक (रोख रक्कम दहा हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र ) नूतन विद्या मंदिर मुला मुलींचे हायस्कूल , परभणी ,
द्वितीय पारितोषिक(रोख रक्कम सात हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र ) मराठवाडा हायस्कूल, शिवाजी नगर , तृतीय पारितोषिक (रोख रक्कम पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र )मराठवाडा हायस्कूल, खंडोबा बाजार तर उत्तेजनार्थ पारितोषिक (रोख रक्कम एक हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र )अभिनव विद्या विहार प्रशाला, पूर्णा यांनी प्राप्त केले.
विजेत्या स्पर्धकास मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अरुण बोराडे यांनी केले. तर सूत्रसंचालन सुभाष ढगे यांनी केले व स्पर्धेचे विभाग प्रमुख निलेश तिवटनकर यांनी आभार मानले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बाल विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!