राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व. नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत मालेगाव व शेकाप बीड अंतिम फेरीत दाखल
सेलू / नारायण पाटील – सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू नितीन व्यायाम शाळा कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू द्वारा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमीत्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व. नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा -२०२४ नूतन महाविद्यालय क्रिडांगण, सेलू येथे दि. 22 जानेवारी 2024 रविवार वार रोजी सकाळ सञात सी.सी. मालेगाव वि. इम्रान लातूर दरम्यान नाणेफेक लातूर संघाने जिंकून प्रथम फलंदाजी मालेगाव संघांस आमंञित केले 20 षटकात 6 गडी बाद 206 धावा केल्या यात इम्रान गेल 68, इम्रान अहमद 26,असिफ खान48, खलिल जमान 34, धावांची योगदान दिले. इम्रान लातूर च्या आक्रमक मारा सुधाकर भोसले, रविंद्र जाधव यांनी 1-1गडी तंबूत पाठवले, तर आशिष सुर्यवंशी 2 गडी बाद केले.
इम्रान लातूर संघाने 206 धावाचा पाठलाग करताना 20 षटकात 139/8 गडी बाद झाले यात निशांत पवार यांनी 10 , सचिन तिवारे 50,चेतन कुरदळे 23,ऋषिकेश पुले 17 धावांचे योगदान दिले. मालेगाव संघाच्या वतीने गोलंदाजी करताना इशांत राय 3 गडी, इम्रान अहमद, मुज्जिम्मल खान 1-1 गडी बाद केले. व 67 धावांनी विजयी होऊन अंतिम फेरीत गाठली.
सामनावीर पुरस्कार मालेगाव च्या इम्रान गेल यास भाजपा तालुकाध्यक्ष दत्तराव कदम, लक्ष्मण सोळंके, बालाजी चव्हाळ,मंडळाचे अध्यक्ष हरीभाऊ लहाने आदी उपस्थित होते.
: दुपारच्या सत्रात उपांत्य फेरीत तुळशी परभणी वि. शेकाप बीड दरम्यान होऊन तुळशी परभणी संघाने प्रथम फलंदाजी करताना 19 षटकात सर्व बाद 123 धावा केल्या. यात नयन चव्हाण 25, सौरभ शिंदे 30, अशिष सुर्यवंशी 31 धावांचे योगदान दिले.
बीड संघाच्या भेदक मारा धर्मेंद्रसिंग ठाकुर 3 गडी ,सय्यद सरफोरज,शेख सिद्दीकी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
शेकाप बीड संघाने 123 धावांचा पाठलाग करताना 15 षटकात 129/4 गडी बाद झाले. सलमान अहमद 30, प्रदीप जगदाळे 36, आदर्श जैन 42 धावा करत ,6 गडी राखून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
परभणी संघाच्या वतीने शेख आरेफ, अभिजित मुंढे, उमेश शोभणे 1-1 गडी बाद करु शकले.
सामनावीर पुरस्कार शेकाप बीडच्या धर्मेंद्र ठाकुर यास ओमप्रकाश तोष्णीवाल, जुगलकिशोर बाहेती, काशीनाथ पल्लेवाड, स्पर्धा संयोजक कुणाल लहाने, गणेश माळवे
यांच्या हस्ते देण्यात आला.
पंच सय्यद जमशेद, गंगाधर शेवाळ, गुणलेखक:सलमान सिद्दीकी,प्रमोद गायकवाड, समालोचक, शेख यासेर, विजय वाघ,पवन फुलमाळी,मोईन शेख, वैभव सरकटे, यांनी केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी संदीप लहाने,राजेश राठोड,अभी चव्हाण,मसूद अन्सारी,प्रमोद गायकवाड, गजानन शेलार,दीपक निवळकर,झिशान सिद्दीकी,मोईन शेख,मोसीन सय्यद,अजय काष्टे, मंगेश गाडगे,सुरज शिंदे, श्रीशैल्य फटाले,आदित्य आडळकर,बंटी सोळंके,नाविद शेख, फाजील बागवाण,कफील बागवान,कपिल ठाकूर,सोनाजी पौळ,आलीम पठाण,वैभव सरकटे, माझ अन्सारी,श्लोक लिंगे यांनी केले.
राम मंदिर स्थापन दिन नितीन क्रीडा मंडळ सेलू च्या वतीने मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला. भगवान रामाच्या प्रतिमेचे पुजन करुन, फटाके फोडुन आनंद उत्सव साजरा केला.
याप्रसंगी मा. आ. हरीभाऊ काका लहाने म्हणाले आज संपूर्ण भारतवासीयांचे स्वप्नं साकार झाले आहे. कारसेवकांचे योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मी 1992 साली आमदार असताना सहभागी झाले होते.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष दत्तराव कदम, विनोद तरटे, अविनाश शेरे, बालाजी चव्हाळ , लक्ष्मण प्रा. नागेश कान्हेकर, गणेश माळवे, माधव लोकुलवार,