सेलू तालुका व शहर काँग्रेस कमिटी बैठक संपन्न

3 91

सेलू (प्रतिनिधी)
परभणी जिल्ह्यात दोन दिवसांची पदयात्रा दिनांक 4 व 5 मे 2025 दोन दिवस नरसिंह पोखरणीं ते परभणी पर्यत आयोजित करण्यात येणार आहे.त्याकरिता सेलू तालुका काँग्रेस ‘सद्भावना पदयात्रा’ यशस्वीपणे आयोजन नियोजन बैठक घेण्यात आली.सदरील बैठकीचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष हेमंतराव अडळकर हे होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये काँग्रेस चे पदयात्रा समन्व्यक तथा प्रवक्ते सुहास पंडित,युवक अध्यक्ष अमोल जाधव,माजी नगरध्यक्ष पवन अडळकर,युवक प्रदेश सरचिटणीस वैजनाथ देवकते,हैं जवान समन्व्यक सुमित देशमुख हे होते.
बैठकीचे अध्यक्ष हेमंतराव अडळकर बोलले कि,काँग्रेस पक्षाच्या”सद्भावना पदयात्रा कार्यक्रमात सक्रिय सहभाग देणार व ताकदीने सहभागी होणार असल्याचे जाहीर केले व सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट दर्शवावी,अशी अपील केली आहे.सुहास पंडित यांनी सांगितले कि,पदयात्रा केवळ राजकीय नसून,समाजाच्या सर्व घटकांना एकत्र आणण्याचा उपक्रम आहे. काँग्रेसच्या मूलभूत तत्त्वांनुसार,सर्वांना न्याय आणि विकासाची हमी देण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.सदरील पद यात्रा जिल्हाध्यक्ष सुरेशराव वरपुडकर यांच्या नियोजनाखाली होणार आहे असे सांगितले. युवक अध्यक्ष अमोल जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले कि,तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचून,लोकांच्या समस्यांचे निराकरण करणे आमचे ध्येय आहे.तसेच या पदयात्रेद्वारे समाजातील एकता, सहिष्णुता आणि प्रगतीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल. पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल .या पदयात्रेच्या बैठकीत पुढील कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यात आली असून, पक्षाच्या सामाजिक न्याय आणि विकासाच्या भूमिकेबाबत चर्चा झाली.बैठकीचे प्रास्ताविक युवक काँग्रेसप्रदेश सरचिटणीस श्री इरफान जमीनदार यांनी तर आभार दिलावर शेख यांनी केले मा.नगराध्यक्ष पवन आडळकर, मा नगरसेवक शेख रहीम, विनोद तरटे,मा.नगरसेवक मुस्ताक रब्बानी, मुळाविकर नाना,योगेश कुलकर्णी,फरहान रब्बानी,सुमित देशमुख,इम्तियाज अली खान , इमरान शेख,आतिक कुरेशी यांच्या सह काँग्रेस,जवान अभियानाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि इतर समविचारी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!