राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा सेलू तालुका काँग्रेसकडून निषेध
सेलू,दि 29 ः
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील निलंबनाचा सेलू तालुका काँग्रेसकडून निषेध नोंदवण्यात आला असून तहसीलदार दिनेश झापले यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी हुकूमशाही पद्धतीने वागणार्या केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच केंद्र सरकारची ही एकाधिकारशाही थांबविण्याची मागणी तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देवून करण्यात आली.
राहुल गांधी यांना आधी संसदेत बोलू दिले नाही. नंतर ते जे बोलले, ते कामकाजातून वगळण्यात आले. आता तर एका निकालाचा आधार घेवून त्यांचे संसद सदस्यत्वच रद्द करण्यात आले. हा प्रकार म्हणजे विरोधीपक्ष आणि पर्यायाने सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. या कार्यवाही मुळे देशातील जनता अस्वस्थ झाली असून हे प्रकार न थांबल्यास देशातील लोकशाही मानणारा प्रत्येक नागरिक राहुल गांधी होवून रस्त्यावर ऊतरेल, असा ईशारा या प्रसंगी बोलताना काँग्रेस तालुकाध्यक्ष हेमंत आडळकर यांनी दिला. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष हेमंत आडळकर,संभाजी पवार, तालुका अल्प संख्याख अध्यक्ष मुश्ताक रब्बानी, नरसिंग हरणे, अतिख कुरेशी,बापूराव डख, राजेंद्र गाडेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.