सेलू तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणाला सुरुवात

0 21

सेलू (प्रतिनिधी )
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणातून नवीन अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन तंत्र अवगत करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा शिकते करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांनी केले.
येथील कै. सौ. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात गटसाधन केंद्राच्या वतीने सेलू तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात सुरू असलेल्या वर्गांना गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत,केंद्रप्रमुख विजय चिकटे यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले. या वेळी तालुका प्रशिक्षण समन्वयक सुनिता काळे,अंजली पद्माकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. सलगर, जेष्ठ अधिव्याख्याता तथा प्रशिक्षण जिल्हा समन्वयक डॉ. अनिल मुरकुटे, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत,जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण होत आहे. सुलभक म्हणून नवनाथ वाघमारे, गजानन शितळे, आम्रपाली खाजेकर, प्रवीण कुलकर्णी, उड़ान कंठाळे, उदयपाल सोनकांबळे, शेख मौर कृष्णा पुरणाळे, अनुजा सुभेदार, डॉ.यशवंत कुलकर्णी, गजानन कावळे, अनिल रत्नपारखी, मीरा डोळस, शिवाजी पिंपळ कर, नीलेश पांचाळ, नीलेश गडम, रवींद्र कदम आदी काम पाहत आहेत. ८ मार्च पर्यंत चार टप्प्यांत पहिली ते बारावीच्या एकूण ९२५ शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती समन्वयक सुनिता काळे यांनी या वेळी दिली. प्रशिक्षणासाठी शारदा विद्यालयाचे मुख्याध्यापक दिगांबर शिंदे, बाळासाहेब साखरे,सुभाष मोहकरे,समन्वयक सुनिता काळे, अंजली पद्माकर, अरूण राऊत,मरेवार, अश्विनी आम्ले तसेच सुहास नवले, माधव गायकवाड, जनार्दन कदम, दत्ता काळे आदींसह केंद्रप्रमुख, शिक्षक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

error: Content is protected !!