वृक्षमित्रांना राखी बांधत केले सेलूच्या महिला मंडळाने रक्षाबंधन साजरे

0 53

 

सेलू / नारायण पाटील – भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा निर्माण करणारा उत्सव म्हणजे रक्षाबंधन होय..याच उत्सवाच्या निमित्ताने सेलू महिला मंडळाच्या वतीने आज सेलू येथील वृक्ष लागवड व संवर्धनाचे निरंतर कार्य करणाऱ्या मोरया प्रतिष्ठान परिवाराच्या वृक्ष मित्रांना आमंत्रित करत रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला.

 

 

या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलू महिला मंडळाच्या अध्यक्षा मा.सौ.विजयाताई कोठेकर तर प्रमुख अतिथी म्हणून मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अभिजित राजूरकर होते. उपक्रमाचा शुभारंभ उपस्थितांच्या हस्ते वृक्षाला राखी बांधून करण्यात आला. यानंतर उपस्थित वृक्षमित्रांचे औक्षण करत हातावर राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित महिला भगिनींना बेलाचे रोप ओवाळणी म्हणून देण्यात आले.उपक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती ललिता गिल्डा यांनी करत रक्षाबंधन उत्सवाचे महत्व विशद करत निसर्गाला भाऊ मानून त्याला सर्वांनी जपण्याचे आवाहन केले. 

 

 

मोरया प्रतिष्ठानच्या वतीने श्री अभिजित राजूरकर यांनी मनोगत व्यक्त करताना सेलू महिला मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करत निसर्गाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेवून पर्यावरण अबाधित राखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगत वृक्ष संवर्धनासोबत समाजातील महिला भगिनीवर वाढत चाललेले अत्याचार रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगत यावर लवकरच सेलू शहरातील सर्व संघटना सह पोलिस प्रशासनाची बैठक आयोजित करून सेलू तालुक्यात ताईची सुरक्षा मोहीम राबविणे गरजेचे असल्याचे सांगितले.सेलू महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.विजयाताई कोठेकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना मोरया प्रतिष्ठान परिवाराच्या वतीने सुरू असलेल्या वृक्ष संवर्धन मोहिमेत सेलू महिला मंडळ तन मन धनाने सक्रिय राहणार असल्याचे सांगत वृक्ष संवर्धनासाठी मंडळाच्या वतीने २१०० रू सहकार्य निधी देत हरित सेलू करण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी वृक्ष संवर्धन करण्यासाठी मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. 

 

 

सेलू महिला मंडळाच्या श्रीमती करूणा बागले यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले.सौ उज्वला भाला (लड्डा ) यांनी बंगाल येथे अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या डॉक्टर तरुणीसाठी आपल्या संवेदना व्यक्त करत अश्या घटनांची पुनरावृत्ती न होण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याचे सांगितले. उपस्थितांच्या वतीने बंगाल येथील अत्याचारात मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टर तरुणीला श्रद्धांजली अर्पण करत बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध उपस्थितांनी केला.या उपक्रमासाठी सेलू महिला मंडळाच्या सचिव श्रीमती ललिता गिल्डा,सौ अनुपमा देवधर,सौ.सुरेखा वांभूरकर,सौ.रजनी सुभेदार,सौ. रूपा काला,सौ लक्ष्मी चारठाणकर,सौ.मिरा जोशी,सौ.सुनीता पाटील,सौ.मिरा देशमुख,सौ.अर्चना आगजाळ मोरया प्रतिष्ठानचे श्री शिवकुमार नावाडे,श्री सुभाष बेदरकर,श्री रितेश मंत्री,श्री सदाशिव बर्वे,श्री मनोहर चलोदे,श्री सुजित मिटकरी, श्री.वाकडीकर,श्री कैलास स्वामी मिटकर,श्री अरुण रामपुरकर,चि.प्रथमेश भगत आदींनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!