सेलूत जैन समाजाने दुकाने बंद ठेवून निषेध
सेलू,दि.21(प्रतिनिधी) : झारखंड राज्यातील शाश्वत जैन तीर्थराज श्री सम्मेद शिखरजींचे संरक्षण, पावित्र्यता आणि स्वतंत्र ओळख राखावी, या मागणीसाठी जैन समाजबांधवांनी बुधवारी (दि.21) सेलू शहरासह जिल्ह्यातील दुकाने पूर्णतः बंद ठेवली.
झारखंड राज्य सरकारने जैन समाजाचे पवित्र स्थळ असणार्या श्री सम्मेद शिखरजी पारसनाथ पर्वतराज गिरीडिहला पर्यटनस्थळ घोषित केल्याचा जैन समाजबांधवांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. झारखंड सरकारच्या या निर्णयाने या पवित्र स्थळाची स्वतंत्र अशी ओळख नष्ट होणार आहे. त्यामुळे सरकारने तो निर्णय तातडीने मागे घ्यावा व शाश्वत जैन तीर्थराज श्री सम्मेद शिखरजीचे संरक्षण, पवित्रता आणि स्वतंत्र ओळख कायम राखावी, अशी मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी अरूणा संगेवार यांना देण्यात आले के
दरम्यान,सकल सेलू जैन समाजबांधवांनी केलेल्या या आंदोलनात शहरातील दुकाने बंद होती.