सेलूत नृसिंह जन्मोत्सवास सुरुवात

0 56

सेलू / नारायण पाटील – प्रतिवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील येथील पांडे गल्ली मधील नरसिंह मंदिर मध्ये नरसिंह जन्मोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला जाणार असून दि ३ मे पासून या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे .
दि ३ मे ते १४ मे पर्यंत चालणाऱ्या जन्मोत्सव कार्यक्रमात दररोज सकाळी “श्री “च्या मूर्तीस अभिषेक व रात्रौ ८ वाजता येथील गुरुवार पाठ मंडळाच्या वतीने गणपती अथर्वशीष ,रामरक्षा ,गीतेचा अध्याय व विष्णुसहस्रनाम पठण होणार आहे .

 

दि ११ मे हा या जन्मोत्सवातील मुख्य दिवस असून त्यादिवशी सायंकाळी ७ वाजता मोठ्या उत्साहात नरसिंह जन्माचा कार्यक्रम होणार आहे .यावेळी येथील त्रिंबक वेद प्रतिष्ठान चे संस्थापक तसेच भागवताचार्य नागनाथ गुरू विडोळीकर यांच्या अमृततुल्य व रसाळ वाणीमधून नरसिंह जन्माच्या अध्यायाचे वाचन केले जाणार आहे .
रात्री ९ वाजता “श्री ” ची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे .

 

दि १२ मे रोजी दुपारी १ ते ३ यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .तसेच दि १३ मे रोजी सायंकाळी ६ ते ८ यावेळेत पिठलं व भाकर या प्रसादाचे आयोजन करण्यात आले असून येथील नरसिंह भक्त हेमंत दिग्रसकर हे प्रसादाचे आयोजक आहेत .
दि १४ मे रोजी सकाळी ” श्री ” मूर्तीस अभिषेक व रात्रौ ८ वाजता गुरुवार पाठ मंडळाच्या विडा भजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे .तरी या सर्व कार्यक्रमात भाविक भक्तांनी उपस्थित राहून दर्शन ,जन्मकथा श्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा .असे आवाहन मंदिर चे पुजारी अनंतराव पाटील ,देविदास पाटील ,केशव पाटील व नारायण पाटील यांनी केले आहे .

संकटात भक्ताच्या हाकेला आहे त्या ठिकाणी धावून येणाऱ्या भगवान विष्णूच्या चौथ्या अवताराच्या जन्मोत्सवात अनेक भाविक भक्त आपल्या मनातील अडचणी व दुःख दूर करण्यासाठी आपली सेवा देऊन व दर्शन घेऊन या उत्सवात मोठ्या उत्साहात सहभागी होतात .व आपली मनोकामना पूर्ण करून घेतात .

error: Content is protected !!