“वनस्पतीशास्त्राच्या वाढीसाठी चर्चासत्रे म्हणजे स्तुत्य आणि अनुकरणीय उपक्रम” – डॉ. यादव
नामदेव बांगर
शेंडी, भंडारदरा,दि 07ः
डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी आयोजित ३१ व्या इंडियन असोसिएशन फॉर एंजिओस्पर्म ॲण्ड टॅक्सोनॉमीच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित करताना डॉ. एस्.आर्. यादव बोलत होते. या चर्चासत्राच्या प्रो. वाय. डी. त्यागी अवॉर्डसाठी व्याख्यान देताना त्यांनी वनस्पतीशास्त्रासंबंधित त्यांचा प्रवास विद्यार्थी आणि संशोधकांसमोर मांडला. सध्या डॉ. यादव हे इंडियन असोसिएशन फॉर एंजिओस्पर्म ॲण्ड टॅक्सोनॉमी (IAAT) चे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असुन निसर्गसंवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत. ‘डॉक्युमेंटेशन, बायोप्रोस्पेक्टींग ॲण्ड बायोडाईवर्सीटी फॉर सस्टेनेबल डेवलपमेंट’ या विषयावर हे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात आयोजित करण्यात आले असून देशभरातुन तब्बल २५० हून अधिक संशोधक, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमी यामध्ये सहभागी झाले आहेत.
डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डीचे प्राचार्य डॉ. मोहन वामन या चर्चासत्राचे आयोजक सचिव म्हणुन काम पाहत असुन सदर चर्चासत्र हे ५ एप्रिल पासुन ७ एप्रिल २०२२ पर्यंत चालणार आहे. देशभरातुन निष्णात आणि प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले असुन पहिल्या दिवशी उद्घाटनप्रसंगी भारतीय वनस्पती सर्वेक्षण, भारत सरकारचे संचालक मा. डॉ. अशिओ मावो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू मा. डॉ. एन्. एस्. उमराणी, IAAT चे अध्यक्ष मा. डॉ. ससिधरन, सचिव मा. डॉ. संतोष नॅम्फी, वनविभाग अधिकारी श्रीयुत. रणदिवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
उद्घाटनसमारंभामध्ये या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होणाऱ्या संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधाच्या पुस्तकाचे सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या समारंभानंतर पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात मा. डॉ. अशिओ मावो यांचे मुख्य भाषण होते. या भाषणामधुन संशोधकांना संबोधित करताना डॉ. मावो यांनी स्थानिक लोकांचे वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासातील असामान्य महत्व विशद केले. ” स्थानिक रहिवाशी हे तेथील झाडा-झुडूपांशी संबंध सांगतात. त्यांच्या मुळापासुन शेंड्यापर्यंतची प्रात्यक्षिक माहिती या लोकांना असते. त्यामुळे संशोधन करताना त्यांच्याशी समन्वय साधने खूप महत्वाचे आहे. अन्यथा संशोधन अपुरे राहते”, असे प्रतिपादन डॉ. मावो यांनी यावेळी केले.
त्यानंतर पुणेस्थित राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे वरिष्ठ संशोधक मा. डॉ. अशोक गिरी सरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासाचे महत्व आणि आधुनिक संशोधन या गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला.
सदर चर्चासत्र हे प्रथमत:च अभयारण्यामध्ये घेण्यात आले असुन त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील साहेब, उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव डॉ. सोमनाथदादा पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव व कोषाध्यक्ष डॉ. यशराजदादा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी डॉ. नरसिंम्हण, डॉ. सुनोज कुमार, डॉ. प्रभा भोगावकर, डॉ . अरविंद धाबे, डॉ. मिलिंद सरदेसाई, डॉ. सचिन पुणेकर, डॉ. महेंद्र ख्याडे आदी ख्यातनाम संशोधक उपस्थित होते.
परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. मुकेश तिवारी, प्रा. मंजुषा कोठावदे, प्रा. राधाकृष्ण ठाणगे, प्रा. करिष्मा सय्यद, प्रा. खालीद शेख, प्रा. सतिष ठाकर, प्रा. भागवत ढेसले, प्रा. चेतन सरवदे, प्रा. गणेश फुंदे, प्रा संध्या पाटील, प्रा. बबलू नवले, प्रा.मयुर मुरकुटे, प्रा. रोहित वरवडकर आदींनी सहभाग नोंदवला.