व्हाईस ऑफ मीडियाच्या सेलू् तालुकाध्यक्षपदी शिवाजी आकात, सचिव मोहन बोराडे
नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड
सेलू,दि 17 ः
व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची २०२५-२६ या वर्षातील नूतन कार्यकारिणी निवडीसाठी रविवारी, १६ फेब्रुवारी रोजी तालुकाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी संघटनेच्या सभासदांची बैठक पार पडली. यामध्ये सेलू तालुकाध्यक्षपदी शिवाजी आकात यांची, तर सचिवपदी मोहन बोराडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची व नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
नूतन कार्यकारिणी या प्रमाणे : अध्यक्ष : शिवाजी आकात, सचिव : मोहन बोराडे, उपाध्यक्ष : पंकज सोनी, कार्याध्यक्ष : बाबासाहेब हेलसकर, कोषाध्यक्ष : संतोष कुलकर्णी, सहसचिव : बालाजी सोनवणे, संघटक : श्रीपाद कुलकर्णी
प्रसिध्दी प्रमुख : प्रताप काकडे
कार्यवाहक : शिवप्रसाद काबरा मार्गदर्शक सदस्य : राम सोनवणे, नारायण पाटील, अशोक अंभोरे,डाँ.विलास मोरे, जयचंद खोना, प्रसाद खारकर,सचिन हिवरे, शंभू काकडे, लक्ष्मण सोन्ने यांचा समावेश आहे.