श्रीराम प्रतिष्ठान करणार नवीन विज्ञान केंद्राची स्थापना

0 47

सेलू (नारायण पाटील)
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अप्लिकेशन्सच्या प्रगती, प्रसार आणि संवर्धनासाठी समाजातील विविध समस्या आणि विकासात्मक कामांसाठी व विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकांपर्यंत नेण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान सेलू ही संस्था नेहमी नवीन उपक्रमाद्वारे मराठवाड्यात काम करत आहे.
आज भारतातील एक उत्कृष्ट तांत्रिक अभियंता व अणुऊर्जा शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर व नेहरू विज्ञान केंद्राचे प्रमुख उमेश कुमार रस्तोगी, एन डी देशमुख सोबत उपस्थित मान्यवर वैज्ञानिक यांच्याशी संस्थापक अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठान सेलू डॉ संजय रोडगे व डॉ सुनील मोडक यांनी चर्चा केली व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन संकल्पना रुजवण्यासाठी, तसेच विज्ञान विषयक कृतिशील उपक्रम यांचा प्रसार प्रचार कसा करता येईल. असे अनेक विषयावर डॉ अनिल काकोडकर यांनी मार्गदर्शन केले.सोबत यावेळी विज्ञान शिक्षक नारायण चौरे व पर्यवेक्षक अर्जुन गरुड उपस्थित होते.

error: Content is protected !!