चारठाणा येथे नऊ जानेवारीपासून श्री संत जनार्दन महाराज यात्रा महोत्सव
चारठाणा,दि 04 (प्रतिनिधी)ः
जिंतूर तालुक्यातील चारठाणा व परिसरातील अनेक भाविकांची श्रद्धा असलेले संत जनार्दन महाराज यांच्या ८५ व्या पुण्यतिथी निमित्त यात्रेला गुरुवार दि.९ जानेवारी सुरुवात होणार आहे.यात्रे निमित्ताने मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये दि.८ जानेवारी रोजी रात्री श्री ह.भ.प.मन्मथआप्पा खके यांचं किर्तन होणार असून,९ जानेवारी रोजी ह.भ.प. नामदेव महाराज ढवळे यांचे काल्याचे किर्तन होईल त्या नंतर पुण्यतिथी भंडारा व महापंगत होणार आहे.
१०जानेवारी दुपारी पालखी सोहळा तसेच रात्री संस्कृत पंडित शिवाप्पा खके गुरुजी चारठाणकर याचे प्रवचन होईल.
दि.११ जानेवारी रोजी रात्री बापुराव महाराज याचं व १२ जानेवारी रोजी रात्री विलासराव देशपांडे गुरुजी चारठाणकर याचे प्रवचन होईल.
गाड्या ओढण्याचा कार्यक्रमला सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे.
दरवर्षी भाविक आपली इच्छा पुर्ण होण्यासाठी येथे दर्शनासाठी येतात.या परंपरेनुसार कन्न्याच्या प्रसादाची पतंग कै.उत्तमराव जोगवाडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या मैदानात ४ वाजता होईल. भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री संत जनार्दन महाराज संस्थान चा वतीने करण्यात आले आहे.
चारठाणा व परिसरातील काही वर्षांपासून युवकांनी मोतीचुर लाडुंच्या प्रसादाची परंपरा चालु केली.दरवर्षी प्रमाणे लाडुंचा प्रसादाचे दर्शन रांगेत सकाळपासून वाटप करण्यात येणार आहे.