श्रीमती निर्मलाकाकी विटेकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज…महायुतीची एकजुट
परभणी,दि 24 ः
पाथरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती निर्मलाकाकी विटेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी एकी दाखवत विजयाचा निर्धार केला.
पाथरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आला आहे.या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार राजेश विटेकर यांच्या मातोश्री जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती निर्मलाकाकी विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली. गुरुवारी मोठे शक्ती प्रदर्शन करत श्रीमती विटेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज पाथरी येथील तहसील कार्यालयात दाखल केला. यावेळी आमदार राजेश विटेकर, माजी आमदार शिवसेना नेते हरिभाऊकाका लहाने, भाजपाचे नेते डॉ. केदार खटिंग, सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, मानवतचे माजी नगराध्यक्ष डॉ.अंकुश लाड, पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा भावना नखाते, सुभाष अंबट, यांच्यासह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी एकजूट दाखवत विजयाचा निर्धार व्यक्त केला.
पाथरी मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद आहे. आमदार विटेकर यांनी घटक पक्षातील सर्वच नेत्यांशी समन्वय साधत एकजुटीची मोट बांधली आहे. गावागावात आणि घराघरात विटेकर परिवारांवर प्रेम करणारी जनता असल्याने या मतदारसंघात सध्या उत्साहाचे वातावरण आहे.
पाथरी, सोनपेठ, मानवत या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. ग्रामपंचायत, विविध सेवा सहकारी सोसायटी या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पाथरी मतदारसंघात भक्कम असून सोबतीला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असल्यामुळे येथे राष्ट्रवादीला आणखी बळकट मिळाली आहे.
…..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, मा.श्री.अजित दादा पवार साहेब व पक्षाच्या वरिष्ठांनी हि संधी दिल्याबद्दल मी त्यांची मन: पूर्वक आभारी आहे. आमदार म्हणून निवडून येत राज्याच्या धोरण निर्मितीच्या प्रक्रियेत योगदान देण्याची आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तडीस नेण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी आपले आशीर्वाद, प्रेम, सदिच्छा आणि शुभेच्छा कायम पाठीशी कायम राहू द्या.
– निर्मला उत्तमराव विटेकर