म्हणून दादांनी अखेर निर्णय घेतलाच…

ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

0 462

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणाला हादरा देणारी बातमी आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षात बंड केलं आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात (The existence of the Mahavikas Alliance is threatened) आल्याचं सांगितलं जात आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजच्या शपथविधीला आपला पाठिंबा नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, आता शरद पवार हे पक्षातील बंड कसं रोखतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

अजित पवार यांनी शरद पवार यांना कोणता अल्टीमेटम दिला होता? (What ultimatum did Ajit Pawar give to Sharad Pawar?)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नुकताच वर्धापन दिन सोहळा पार पडला. या सोहळ्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारायला आवडेल, अशी इच्छा व्यक्त केली. त्याचवेळी जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची कारकीर्द अजितदादांनी वाचून दाखवली. मला विरोधी पक्षनेतेपदापेक्षा संघटनेत काम करायला अधिक आवडेल, अशी इच्छा प्रदर्शित करतानाच पक्षश्रेष्ठींनी यावर निर्णय घ्यावा, असं अजित पवारांनी भर सभेतच सांगितलं. हाच अल्टीमेटम अजित पवार यांनी शरद पवार यांना दिलेला होता.

 

 

एक जुलैपर्यंत या संदर्भातला निर्णय घ्यावा, असं अजित पवार यांनी शरद पवारांना कळविलेलं होतं. मात्र हा अल्टीमेटर शरद पवार यांनी मान्य केला नसल्याने सध्या अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह आपली वेगळी चूल मांडून राजकारणात मोठा भूकंप केलाय.

 

संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया…
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले “मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.” होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.” असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.

error: Content is protected !!