सौर ऊर्जेचा पॅनल थेट विहिरीत

0 36

परभणी,दि 07
परभणीसह परिसरात दिनांक 6 रोजी  रात्री आठ वाजता  झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली असून काही ठिकाणी सामानाची नासधुस झाली आहे.परभणी तालुक्यातील आंबेटाकळी येथील सखाराम त्रिंबकराव कुलकर्णी यांच्या शेतातील सौर ऊर्जेचा पॅनल वादळी वाऱ्यात विहिरीत पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या निवासस्थानातील झाड उन्मळुन पडले असुन जेसीबीच्या साह्याने ते बाजुला करण्यात आले. तसेच राजगोपालचारी उद्यानातील अनेक झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

error: Content is protected !!