श्री सारंगस्वामी विद्यालयाचे हंट फॉर ज्युनियर सायंटिस्ट स्पर्धेत यश
परभणी,दि 21 ः
परभणी येथील मोरया फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या हंट फॉर ज्युनियर सायंटिस्ट 2025 हे विज्ञान प्रदर्शन पार पडले. यात जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येने अनेक शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या विज्ञान प्रदर्शनात श्री सारंगस्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 4 पारितोषिके मिळवीत घवघवीत यश संपादित केले आहे.
या प्रदर्शनात ज्युनियर गटातून इ. 6 वितील राजविर भिसे, प्रथमेश यादव यांच्या गटाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
तर उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल इ. 5 वी मधील अलिया शेख या विद्यार्थिनीला, उत्कृष्ट निष्कर्षाबद्दल इ. 5 वीतील राघव देशमुख आणि इ. 7 वितील सिद्धी देशमुख या विद्यार्थ्यांना, तसेच सिनियर गटातून उत्कृष्ट मॉडेलबद्दल इ. 8वी मधील माऊली बुचाले या विद्यार्थ्याला पारितोषिक प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोकराव सावरगावकर, कार्याध्यक्ष श्री. दगडय्या मुदगलकर, सरचिटणीस श्री. धन्यकुमार शिवणकर, शाळेचे प्र. मुख्याध्यापक श्री. एन. व्ही. निलंगे यांनी अभिनंदन केले आहे.