सेलूत जैन मुनींच्या हत्येचा तीव्र निषेध

0 175

 

सेलू / नारायण पाटील – कर्नाटकातील हिरगुडी (ता. चिकोडी जि. बेळगाव) येथील परमपूज्य 108 श्री कामकुमारनंदी महाराज यांच्या अपहरणासह क्रुर पध्दतीने केलेल्या हत्येच्या प्रकरणातील मारेकर्‍यांना त्वरीत अटक करीत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय जैन मायनॉरिटी ऑर्गनायझेशन या संघटनेसह सेलू सकल जैन समाज बांधवांनी केली.

 

 

सेलू सकल जैन समाजाचे गिताराम कोकणे,रमेशकुमार काला,अँड.मयूर बिनायके,ललीत बिनायके, जैन , विशाल संघई, प्रविण संघई, वैभव संघई,दिपक बिनायके,महावीर आचलीया,किशोर रूपडा,नरेश काला,आनंद काला,वायकोस,गंगवाल,हेलस्कर,आचलीया,मुथा, खोना,कालावाडीया,गादिया,रोहीत काला,सौ.अरूणा काला,पुष्पा काला,शोभा बिनायके,रूपाली गंगवाल,सरला काला, यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सेलू प्रशासनास निवेदन सादर केले. त्याद्वारे त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

 

हिरकुडी येथील नंदी पर्वतावर असलेल्या जैन तीर्थावर विराजमान असलेले आचार्य परमपूज्य 108 श्री कामकुमारनंदी महाराज यांची 5 जुलै 2023 रोजी हत्या करण्यात आली. या घटनेमुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातील जैन समाजाला दुःख झाले आहे. चातुर्मासाच्या पवित्र दिवसाच्या सुरुवातीला अशा प्रकारची क्रूर घटना म्हणजे अहिंसेच्या मूलतत्त्वाची निर्घून हत्याच म्हणावी लागेल. या घटनेमुळे संपूर्ण जैन समाजात तीव्र आक्रोश निर्माण झाला असून या अत्यंत निंदनीय जैन समाजबांधवांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. कर्नाटक सरकारने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन हत्या करणार्‍या मारेकर्‍यांना अत्यंत कठोर शिक्षा करावी, केंद्र व राज्य सरकारने जैन साधूंच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

जैन मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ समस्त सेलू जैन समाजाच्या वतीने एक निवेदन सादर करण्यात आले. सकाळी 11 वाजता श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर व श्री 1008 पार्श्‍वनाथ दिगंबर जैन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व समाजबांधवांनी एकत्रित येवून कर्नाटकातील त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच सेलू तील समाज बांधवांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. दरम्यान,उप विभागीय कार्यालय चे अव्वल कारकून शहाणे यांना सादर केलेल्या या निवेदनावर सेलू सकल जैन बांधव व महिला सह समाज बांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

error: Content is protected !!