स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तन कुलातील विद्यार्थी ” देवर्षी नारद युवा कीर्तनकार” पुरस्काराने सन्मानित

पुणे येथील श्री हरीकीर्तनोत्तेजक सभा, यांच्या वतीने सन्मानित

0 53

सेलू / नारायण पाटील – येथील ह भ प योगेश महाराज साळेगावकर संचालित ,स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तन कुलातील पहिला विद्यार्थी लक्ष्मीप्रसाद शंकरराव पटवारी, यांना पुणे येथील श्री हरीकिर्तनोत्तेजक सभा नारदमंदिर यांच्यावतीने देवर्षी नारद युवा कीर्तनकार पुरस्कार, देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. हा मोठा सन्मान असल्याने सर्वत्र स्वागत होत आहे.

 

 

स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कुलचा पहिला विद्यार्थी लक्ष्मीप्रसाद शंकरराव पटवारी हा इयत्ता सहावीत असताना म्हणजेच, ११ वर्षाचा असताना गुरुकुलात आला आहे. गुरुकुलचे संचालक ह भ प योगेश महाराज साळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी, रामदासी कीर्तन सेवेत मोठी झेप घेतली आहे. त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात ,कर्नाटक, राजस्थान,महाराष्ट्र आदी ठिकाणी २०० हून अधिक कीर्तन सेवा केली असून, दरम्यान झी टीव्ही ,गजर कीर्तनाचा, यावरही कीर्तन सेवा केली आहे .तसेच तू माझा सांगाती या जगद्गुरु श्रीसंततुकाराम महाराजांच्या मालिकेत ,श्री संत एकनाथांचे सेवक श्रीखंडया यांची भूमिका देखील केली आहे.दरम्यान स्वामी गोविंददेवगिरीजी गुरुकुल, यांच्या कडून,करवीरपीठाचे शंकराचार्य परमपूज्य विद्यानरसिंहस्वामी यांच्या हस्ते,बालकीर्तनरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

 

त्यामुळे त्याच्या यशस्वी पदार्पणाची नोंद, पुणे येथील मागील अनेक वर्ष हरिदासी कीर्तनाची उपासना करणारी संस्था श्री हरिकीर्तनोत्तेज सभा नारद मंदिर यांनी नोंद घेतली व अतिशय मानाचा समजला जाणारा त्यांचा देवर्षी नारद युवा कीर्तनकार पुरस्कार ,लक्ष्मीप्रसाद पटवारी यांना देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
सोमवार ४ फेब्रुवारी रोजी पुणे येथील नारदमंदिर येथे एका विशेष समारंभात त्याला , ह भ प कीर्तन कलानिधी रामचंद्रबुवाभिडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे., त्यामुळे बालकिर्तनरत्न लक्ष्मीप्रसाद पटवारी यांचे व सेलू शहरातील श्री स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तन कुलाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

 

तसेच राममंदिर समितीचे कोषाध्यक्ष प. पु. स्वामी गोविंददेवगिरीजी व ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कडून अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी सुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!