नापास होण्याच्या चिंतेत विद्यार्थिनींची गळफास घेऊन आत्महत्या

0 117

सेलू / नारायण पाटील – नुकत्याच दिलेल्या बारावी च्या परीक्षेत पेपर अवघड गेल्यामुळे नापास होण्याच्या चिंतेत विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्घटना येथील समता नगर मध्ये आज घडली .

 

समता नगर मधील रहिवाशी अर्जुन पुनसिंग होलिया यांची मुलगी कु साक्षी हिने नुकतीच बारावी आर्ट ची परीक्षा दिली आहे .परंतु परीक्षेत पेपर अवघड गेल्यामुळे आपण पास होऊ की नाही या चिंतेत राहून तिने राहते घराचे मागील रूम मधील पत्राखालील लोखंडी इंगल ला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि २५/३/२४ रोजी सकाळी सहा वाजता घडली आहे .
सदर प्रकरणी अर्जुन होलिया यांच्या खबरीवरून सेलू पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित गुन्हा रजिस्टर १०/२०२४ कलम १७४ सीआरपीसी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ह तेलंग करीत आहेत .

error: Content is protected !!